पुणे – पुण्यामधून आणखी एक संतापजनक व धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. पुणे शहरातील वडगावशेरी भागामधील एका शाळेमध्ये घुसून दहावीमधील शिकणार्या मुलीवर चाकूनं हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवाजीनगर येथील एका शाळेमध्ये ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल (बुधवार) दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील मुलींच्या शाळेमध्ये पीडित मुलगी शाळेमध्ये असताना एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीने तिला बोलण्यात फसवून शाळेच्या बाथरूम नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतरसंबंधित व्यक्तीनं त्या मुलीला या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुला बघतो, अशी धमकीही दिली.
मात्र घडलेला सर्व प्रकार त्या मुलीने तिच्या कुटुंबियांना सांगितला. यानंतर मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित अनोळखी व्यक्ती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असुन, पीडित मुलीकडून अधिक माहिती घेतली जात आहे अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.