नागपुर हादरले! 11 वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार, 9 जणांना अटक

WhatsApp Group

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड (Nagpur news) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 11 वर्षीय मुलीवर वारंवार अनेकांनी अत्याचार (Rape case) केले. यातील एक आरोपी हा मुलीच्या ओळखीचा होता. त्याने खोटे बोलून त्या लहान मुलीला घरी नेले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तसेच याविषयी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्याच्यासोबत इतर काही लोक देखील होते. आता 9 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी ही इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. एका ओळखीच्या व्यक्तीने तिला एक काम आहे असे सांगून आपल्या घरी नेले. यावेळी दोन जणांनी तिच्यावर अत्याचार केला. तसेच याविषयी कोणाला सांगितले तर जीवे मारु अशी धमकी देखील दिली. यावेळी तिच्यावर इतर काही लोकांनी देखील अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर पीडित मुलीला त्यांनी 300 रुपये देखील दिले. हे पैसे आम्ही दिले असे न सांगता ते सापडले आहेत असे घरच्यांना सांगा असे त्यांनी मुलीला सांगितले.

तसेच अजून काही लोक येणार आहेत. त्यांनाही असेच करु दे ते देखील तुला पैसे देखील असे म्हणत नराधमांनी तिच्यावर अत्याचार (Miner girl rape case) केले.

हे प्रकरण समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. गावात यामुळे संतापाचे वातावरण आहे. तर इतर मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातील एक आरोपी हा एका हत्याकांडामधील आरोपी आहे. त्याने या अत्याचाराची कबुली दिली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश होता याविषय पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.