लातूर जिल्ह्यात वादळी पावसाने कहर केला आहे. पावसामुळे येथील शेत शिवारात गारांचा सडा पडला आहे. त्यामुळे शेत पिकांसह मोठे नुकसान झालं आहे. विजांचा कडकडाट होऊन अनेक ठिकाणी वीज कोसळल्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये अकरा जनावरांसह एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आरुषी असं या 11 वर्षीय मुलीच नावं आहे. ती शेळ्या चारण्यासाठी शेतामध्ये गेली असताना तिच्यावर वीज कोसळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.