पाकिस्तानात एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू

0
WhatsApp Group

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात लहान मुले आणि महिलांसह कुटुंबातील 11 सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील लक्की मारवत जिल्ह्यातील तख्ती खेल शहरात हे मृतदेह सापडले आहेत.

पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि घटनेशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी परिसराची नाकेबंदी केली. दोन दिवसांपूर्वी जेवणात विषारी औषध मिसळल्याने या लोकांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृताच्या नातेवाईकाने दोन दिवसांपूर्वी वझिरीस्तानमधून अन्न विकत आणले होते.

घरगुती वादातून घडली घटना

खैबर पख्तुनख्वामधील स्थानिक सूत्रांनी दावा केला आहे की ही घटना काही घरगुती वादातून घडली आहे. याशिवाय घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केलेल्या 11 मृतदेहांमध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांताचे कार्यवाहक मुख्यमंत्री न्यायमूर्ती (निवृत्त) अर्शद हुसैन यांनी पोलीस महानिरीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यात यावे, असे ते म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी डब्ल्यूएचओने पाकिस्तानमध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये देशातील आत्महत्यांचे प्रमाण दिसून आले होते. WHO च्या अहवालानुसार पाकिस्तानमध्ये आत्महत्येचे प्रमाण 8 टक्के होते. यावर ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने वृत्त दिले आहे की, पाकिस्तानमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढल्याने अनेक तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालाचा हवाला देत अनेक तज्ज्ञांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये आत्महत्येचे प्रमाण आठ टक्क्यांच्या पुढे गेले आहे आणि हे खूपच चिंताजनक आहे.