Nashik Bus Accident Fire : नाशिकमध्ये चालत्या बसने अचानक घेतला पेट; 11 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

WhatsApp Group

औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकामध्ये असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने अचानक पेट घेतला. या आगीमध्ये बसमधील जवळपास 11 प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना समोर अली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.

बसनं पेट घेतल्यानंतर काही नागरिकांनी खिडक्यांमधून बाहेर उडी घेत आपला जीव वाचवला. पण काही प्रवाशांना अचानक घडलेल्या घटनेमुळं बसमधून बाहरे पडता आलं नाही. त्यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. आत्तापर्यंत या भीषण अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या अपघाताविषयी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, ‘सर्व पोलीस अधिकारी आणि एसपी यांच्याशी बोलणं झालं असून एकूण 11 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 38 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

सर्व उपचार शासनाच्या वतीने केला जाईल तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये देण्यात येईल’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा