मुंबई – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धा आणि चित्रकलेच्या इंटरमिजेट परिक्षेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत.
खेळामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना असे दिले जातील गुण
- जिल्हास्तरीय क्रीडा सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना – १० गुण
- राज्यस्तरीय क्रीडा सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना – १५ गुण
- राष्ट्रीय क्रीडा सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना – २० गुण
- आंतरराष्ट्रीय क्रीडा सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना – २५ गुण