मुंबई – मुंबईसह राज्यभरात मार्चनंतरच १०० टक्के अनलॉकचा निर्णय होईल, असे आता स्पष्ट झाले आहे. कोरोनाचे प्रमाण असेच कमी होत गेले तर मार्चनंतर १०० टक्के अनलॉकचा निर्णय घेता येईल, अशी माहिती राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांच्याकडून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये ओमायक्रोन सर्वाधिक वेगाने पसरला, पण या व्हेरियंटच्या कमी घातकतेमुळे महिनाभरातच ही लाट नियंत्रणामध्ये येऊ लागली. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, पर्यटन स्थळे, चौपाटया, उद्याने-मैदाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मनोरंजन पार्क, थीम पार्क, स्वीमिंग पूल, रेस्टॉरंट, हॉटेल, चित्रपटगृहे, नाटयगृहे ही 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे