T20 विश्वचषक 2024 1 जूनपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ 5 जूनपासून स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. विश्वचषक स्पर्धेसाठी संघ घोषित करण्याची अंतिम तारीख 1 मे आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाची निवड आयपीएल 2024 दरम्यानच होणार आहे. आयपीएल 2024 दरम्यान निवड समिती खेळाडूंवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, दुखापतीमुळे निवड समिती आणि कर्णधार रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या आहेत.
हे खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत
सध्या भारतीय संघातील 10 खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत या खेळाडूंव्यतिरिक्त निवडकर्त्यांना विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करावी लागणार आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये शानदार गोलंदाजी करणारा मोहम्मद शमी दुखापतीमुळे आयपीएल 2024 खेळत नाहीये. तो T20 विश्वचषकातूनही बाहेर होऊ शकतो. नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, आता त्याने पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे.
MS Dhoni 🤝 World Cup Trophy
Made for each other❤️
📌 BCCI HQ | @msdhoni | #TeamIndia pic.twitter.com/4Bak4bG7pA
— BCCI (@BCCI) April 13, 2024
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनलाही दुखापत झाली आहे. त्यांच्याशिवाय रविचंद्रन अश्विन, मयंक यादव, प्रसिध कृष्णा, नवदीप सैन, संदीप शर्मा आणि शिवम मावी हे देखील दुखापतीने त्रस्त आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा उपकर्णधार नितीश राणा आणि चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाजही दुखापतींचा सामना करत आहेत. विश्वचषकासाठी निवड समितीने युवा खेळाडूंपेक्षा अनुभवाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत कोअर टीममध्ये फारशी छेडछाड होणार नाही. मात्र, यातील काही खेळाडूंच्या दुखापती किरकोळ असल्याने ते लवकर बरे होऊ शकतात.
हे भारतीय खेळाडू जखमी झाले आहेत
मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, नितीश राणा, संदीप शर्मा, दीपक चहर, मयंक यादव, शिवम मावी, नवदीप सैनी.