सावंतवाडीच्या माडखोल धरणात युवक बुडाला, शोधकार्य सुरू

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – सावंतवाडी जवळ असलेल्या माडखोल धरणात (Madkhol Dam sawantwadi sindhudurg) पोहण्यासाठी तीन युवक गेले होते. मात्र यापैकी एक तरुण पाण्यात बुडल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. हा तरुण सावंतवाडीमध्ये खासकीलवाडा येथे राहतो, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सावंतवाडी जवळ असलेल्या माडखोल धरणात हे युवक पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यातील एक माडखोल तर दोघे सावंतवाडी खासकीलवाडा येथे राहणारे आहेत. पार्टी झाल्यानंतर हे युवक पोहण्यासाठी माडखोल धरणाच्या पाण्यात उतरले, मात्र एकाला पोहता येत नव्हते तरीदेखील तो पाण्यात उतरला, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला अशी माहिती त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी पोलिसांना दिली आहे. बुडणाऱ्या युवकाचं नाव अर्जुन विश्राम पाताडे असं असून त्याचं वय 18 वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे.

घटना समजताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्या युवकाची शोधमोहीम सुरू केली. अंधार झाल्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली. दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. पोलिस निरीक्षक शंकर कोरे आणि त्यांचे पोलिस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी घटना समजताच तिथे भेट दिली आहे.