श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये Jammu and Kashmir दहशतवाद्यांविरोधात terrorists लष्कर आणि सुरक्षा दलांची security forces चकमक सुरू आहे. शनिवारी काश्मीरमधील शोपियान येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.
शोपियानमध्ये Shopian झालेल्या या चकमकीमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे दोन जवानही शहीद झाले. ही चकमक शोपियानच्या जैनापोरा येथील चेरमार्ग या गावामध्ये झाली. सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे.
Encounter going on in shopian pic.twitter.com/EBWXdnPVtj
— SPADEX (@SpadeX716) February 19, 2022
सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना घेरले असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागात दहशतवादी असल्याची माहिती सापडली होती. यानंतर लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसराला चारही बाजूने घेरले होते.
सर्च ऑपरेशन सुरू केलं. पथकाला एक संशयित लपला असल्याचे दिसले त्यामुळे पथक पुढे जात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात दाखल सुरक्षा दलाने आणि लष्कराच्या पथकानेही गोळीबार केला. ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला आहे. तर भारताचे 2 जवानही शहीद झाले आहेत.