Jammu and Kashmir: दहशतवाद्यांशी झालेल्या दोन चकमकीत सहा दहशतवादी ठार, एक जवान शहीद

WhatsApp Group

गेल्या काही तासांत जम्मू-काश्मीरच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक झाली असून, त्यात एकूण सहा दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांविरोधातील या कारवाईत एक भारतीय जवानही शहीद झाला आहे, तर 4 जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसांनी (24 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

जम्मूतील सुंजवान भागातील चड्ढा कॅम्पजवळ पहाटे 4:15 वाजता हा हल्ला झाला. येथे दहशतवाद्यांनी ड्युटीवर असलेल्या 15 सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्याला सीआयएसएफने प्रत्युत्तर दिले, त्यानंतर दहशतवादी तेथून पळून गेले.

या संपूर्ण कारवाईत एकूण चार जवान जखमी झाले असून त्यापैकी CISF चा एक ASI शहीद झाला आहे. शहीद झालेल्या जवानाचे नाव एस पटेल असल्याचे सांगण्यात आले आहे. हा 55 वर्षीय जवान सतना (मध्य प्रदेश) येथील रहिवासी होता.

त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. यानंतर सुंजवान भागात चकमक झाली. येथे सकाळी चार जवान जखमी झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी UBGL (ग्रेनेड लाँचर) वरून ग्रेनेड फेकले. एडीजीपी जम्मू मुकेश सिंह यांनी सांगितले की, आम्ही रात्रीच्या वेळी परिसराची नाकेबंदी केली होती, आम्हाला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. अजूनही चकमक सुरूच आहे. दहशतवादी कुठल्यातरी घरात लपून राहिले आहेत. असं ते म्हणाले.

सुंजवान चकमकीत एकूण दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सध्या गोळीबार थांबला आहे. चकमकीनंतर सुरक्षा दलांना दोन AK47 बंदुका, एक सॅटेलाइट फोन मिळाला आहे. दोन्ही दहशतवादी परदेशी असल्याचे सांगण्यात येत आहे.