मुंबई – कलर्स टीव्हीचा (Colors TV) सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत. या शोमध्ये दरवर्षीप्रमाणे बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा शो होस्टींग करत आहे. यावर्षी सलमान खानला फी म्हणून मोठी रक्कम दिली गेली आहे.
सलमान खान गेल्या 11 सीझनपासून सातत्याने हा शो होस्ट करत आहे. त्यांचे होस्टिंग लोकांना खूप आवडत आहे. जेव्हा सलमान ‘वीकेंड का वार’ मध्ये कुटुंबातील सदस्यांचा क्लास घेतो, तेव्हा तो एपिसोड TRP मध्ये वर येतो. हेच कारण आहे की सलमान नेहमीच शोच्या निर्मात्यांची पहिली पसंती राहिला आहे.
यावेळी देखील सलमान खानला शो होस्ट करण्यासाठी मोठी रक्कम देऊ करण्यात आली आहे. स्ट्रीमिंग वेबसाईट लेट्स ओटीटीनुसार (Lets OTT) यावेळी सलमानला 350 कोटी रुपये फी देण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र कलर्स टीव्हीकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
बिग बॉस शो 14 आठवडे चालतो. ही रक्कम सलमानला या 14 आठवड्यांसाठी दिली जाईल. यापूर्वी असे वृत्त आले होते की सलमान खानने यावेळी निर्मात्यांकडून त्याच्या फीमध्ये 15 टक्के वाढ करण्याची मागणी केली होती. 2 ऑक्टोबरपासून कलर्स टीव्हीवर हा शो प्रसारित केला जात आहे.
बिग बॉस १५ मध्ये सहभागी झालेले स्पर्धक
जय भानुशाली, विशाल कोटियन, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, विधी पंड्या, सिम्बा नागपाल, शमिता शेट्टी अक्सा सिंह, निशांत भट, डोनल बिस्ट, अफसाना खान ,इशान सहगल, मिशा साक्षी अय्यर, प्रतिक सहेजपाल, उमर रियाज, साहिल श्रॉफ