अभिनेते नाना पाटेकर यांना दिलासा; अभिनेत्री तनुश्री दत्ता धक्का

WhatsApp Group

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मी टू’ प्रकरणात अखेर दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी २०१८ मध्ये नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले होते.

या आरोपांच्या अनुषंगाने तनुश्री दत्ता यांनी नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या अभावामुळे पोलिसांनी वर्षभरातच केस बंद केली होती.

दरम्यान, लैंगिक छळाच्या प्रकरणात नाना पाटेकर यांच्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार कोर्टाने फेटाळून लावली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने दाखल केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की लैंगिक छळाचे आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. या निर्णयामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, नाना पाटेकर यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला माहिती होतं की हे सर्व खोटं आहे. त्यामुळे मला कधी राग आला नाही. जेव्हा सर्व खोटं आहे, तर राग कोणत्या गोष्टीसाठी करू? आणि सर्व गोष्टी जुन्या झाल्या आहेत. घटलेल्या घटना आहेत. त्यावर आता मी काय बोलणार?”