Women Sexual Health: लैंगिक संबंधाचा कंटाळा? महिलांना असं का वाटतं? जाणून घ्या डॉक्टरांचं मार्गदर्शन

WhatsApp Group

लैंगिक संबंध हे फक्त शारीरिक आकर्षणाचे प्रतीक नसून, ते दोन व्यक्तींमधील जवळीक, प्रेम आणि विश्वासाचा भाग असतो. मात्र, अनेकदा महिलांना लैंगिक संबंधांमध्ये रस उरत नाही किंवा त्यांचा कंटाळा येतो, असे दिसून येते. यामागची कारणं वैविध्यपूर्ण असून, ती मानसिक, शारीरिक तसेच सामाजिकही असू शकतात. या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे.

१) हार्मोन्समध्ये होणारे बदल

महिलांच्या शरीरात दरमहा होणारे हार्मोनल बदल, गर्भधारणेनंतरची स्थिती, पाळीपूर्वीचा त्रास (PMS) किंवा रजोनिवृत्तीच्या काळातील हार्मोनल असंतुलन यामुळे लैंगिक इच्छा कमी होऊ शकते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टीरोन हे हार्मोन्स स्त्रियांमध्ये लैंगिक भावना नियंत्रित करतात. यातील कोणताही बदल त्यांच्या इच्छेवर परिणाम करू शकतो.

२) मानसिक आरोग्याचा प्रभाव

तणाव, चिंता, नैराश्य किंवा आत्मविश्वास कमी होणे या मानसिक कारणांनीही महिलांना लैंगिक संबंधात रस वाटेनासा होतो. कामाचा तणाव, कौटुंबिक कलह, किंवा एखाद्या नात्याशी संबंधित मनस्ताप यामुळे देखील त्यांची मानसिक अवस्था बिघडते आणि त्याचा थेट परिणाम लैंगिक जीवनावर होतो.

३) शारीरिक त्रास व वैद्यकीय कारणं

काही शारीरिक आजार किंवा वैद्यकीय समस्यांमुळे लैंगिक संबंधात रुची कमी होऊ शकते. जसे की थायरॉईड विकार, डायबेटिस, जास्त वजन किंवा शरीरातील काही विकृती. याशिवाय प्रसूतीनंतर होणारे बदल, वैद्यकीय उपचारांमुळे होणारे दुष्परिणाम यामुळेही महिलांमध्ये लैंगिक इच्छा मंदावते.

४) नात्यातील समस्या आणि अपेक्षा

नात्यात असलेली असमाधानकारक भावना, पार्टनरशी असलेली भावनिक अंतर किंवा परस्पर संवादाचा अभाव यामुळे लैंगिक आकर्षणावर परिणाम होतो. महिलांना भावनिक सुरक्षेची गरज असते आणि ती पूर्ण झाली नाही तर त्यांचं लैंगिक जीवन प्रभावित होतं. काही वेळा जोडीदाराची असंवेदनशीलता किंवा फक्त शारीरिक संबंधांमध्ये रस असणं यामुळेही स्त्रियांमध्ये संबंधाविषयी अरुची निर्माण होते.

५) उपाय आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन

जर महिलांना सतत लैंगिक संबंधाचा कंटाळा येत असेल तर त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. हार्मोनल तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, तसेच रिलेशनशिप काउन्सिलिंगच्या माध्यमातून या समस्येवर उपाय शोधता येतो. स्वतःच्या भावना समजून घेणं, जोडीदाराशी खुलेपणानं संवाद साधणं आणि गरज असल्यास उपचार घेणं. हाच दीर्घकालीन समाधानाचा मार्ग आहे. डॉक्टर सांगतात की, “लैंगिक जीवनात समस्या आल्या तर त्यावर संवाद आणि तज्ज्ञ सल्ला हेच सर्वोत्तम उपाय आहेत.”