व्हॉट्सअॅपने 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान प्लॅटफॉर्मवरून 47 लाख खात्यांवर बंदी घातली आहे. कंपनीने मासिक सुरक्षा अहवाल जारी केला आहे. IT नियम 4(1)(d) 2021 अंतर्गत या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कंपनीने एकूण 47,15,906 भारतीय खात्यांवर बंदी घातली, त्यापैकी 16,59,385 खाती WhatsApp ने स्वतःच्या धोरणानुसार बंदी घातली. म्हणजेच, कंपनीकडे या खात्यांविरोधात कोणतीही तक्रार आली नव्हती, परंतु ते व्हॉट्सअॅपचे नियम पाळत नव्हते, त्यामुळे या खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जर तुम्ही प्लॅटफॉर्मवर कंपनीने ठरवलेल्या नियमांचे उल्लंघन करत असाल तर तुमचे खाते देखील बॅन केले जाऊ शकते.
1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान, WhatsApp ने 45,97,400 खात्यांवर बंदी घातली होती, त्यापैकी 12,98,000 खाती कंपनीने कोणतीही तक्रार न करता आधीच बॅन केली होती. ताज्या सुरक्षा अहवालानुसार, मार्च महिन्यात व्हॉट्सअॅपला 4,720 तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी 4,316 तक्रारी खाते बंद करण्याच्या होत्या. यापैकी व्हॉट्सअॅपने केवळ 553 विरोधात कारवाई करत संबंधित खात्यांवर प्लॅटफॉर्मवरून बंदी घातली.
IT नियम 2021 नुसार, 50 लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते असलेल्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दर महिन्याला एक सुरक्षा अहवाल प्रकाशित करावा लागतो, ज्यामध्ये कंपनीने केलेल्या तक्रारी आणि कारवाईची माहिती द्यावी लागते. मार्च महिन्यात व्हॉट्सअॅपने 4.7 दशलक्ष खात्यांवर कारवाई केली आहे.
वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी कंपनी नवीन फीचर्सवर काम करत आहे. लवकरच लोकांना व्हॉट्सअॅपवर स्टेटसवर व्हॉइसनोट, चॅट लॉक इत्यादी अनेक उत्तम फीचर्स मिळणार आहेत. नुकतेच मेटा ने व्हॉट्सअॅपवर हे फीचर जाहीर केले आहे की आता यूजर्स 4 वेगवेगळ्या डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप वापरू शकतात.