पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत नागरिकांना harghartiranga.com या संकेतस्थळावर तिरंगा ध्वजासोबतचे आपले छायाचित्र अपलोड करण्याचे आवाहन केले आहे.
ते ट्वीटमध्ये म्हणाले, “हर घर तिरंगा अभियानामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये एक नवीन चैतन्य, ऊर्जा भरली गेली आहे. देशवासियांनो, यावर्षी हे अभियान एका नवीन उंचीवर घेऊन जायचे आहे. चला तर मग, 13 ते 15ऑगस्ट या कालावधीमध्ये देशाचा ‘मान, सन्मान आणि अभिमान’यांचे प्रतीक असलेला राष्ट्रीय ध्वज घरोघरी फडकविण्यात यावा. तिरंगा ध्वजाबरोबर सेल्फी काढून तो harghartiranga.com या संकेतस्थळावर सर्वांनी जरूर अपलोड करावा.”
‘हर घर तिरंगा’ अभियान ने आजादी के अमृत महोत्सव में एक नई ऊर्जा भरी है। देशवासियों को इस साल इस अभियान को एक नई ऊंचाई पर ले जाना है। आइए, 13 से 15 अगस्त के बीच देश की आन-बान और शान के प्रतीक राष्ट्रीय ध्वज को फहराएं। तिरंगे के साथ https://t.co/0CtV8SCePz पर अपनी सेल्फी भी जरूर…
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2023