श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, पंजाबमधील एका व्यक्तीचा मृत्यू
श्रीनगरमधील शहीदगंज भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्याची बातमी समोर आली आहे. येथे दहशतवाद्यांनी पंजाबमधील रहिवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. अमृतसर येथील अमृतपाल सिंग असे मृताचे नाव असून तो पंजाबचा रहिवासी आहे. दहशतवाद्यांनी त्याच्यावर जवळून एके रायफलने गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे.
श्रीनगरमधील शहीदगंज भागात हल्ला झाला
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतपालवर हल्ला श्रीनगरच्या शहीदगंज भागात झाला. या गोळीबारानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव 25 वर्षीय रोहित आहे. तो अमृतसरचा रहिवासीही आहे. त्याच्यावर एसएमएचएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
I unequivocally condemn the attack that claimed the life of Amrit Pal Singh & left another person fighting for their life in hospital. I send my condolences to the family & loved ones of the deceased and prayers for the swift recovery of the injured person. https://t.co/38U8PGQNdy
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 7, 2024
काश्मीर झोन पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “दहशतवाद्यांनी शहीद गंज श्रीनगरमध्ये अमृतसरचा रहिवासी असलेल्या अमृतपाल सिंग या स्थानिक नसलेल्या व्यक्तीवर गोळीबार केला. त्याचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नेण्यात आले आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. “आणखी माहिती दिली जाईल.”
हेही वाचा – IND vs ENG: टीम इंडियाला आणखी एक झटका; तिसऱ्या कसोटी सामन्यातूनही विराट कोहली बाहेर!
#Terrorists fired upon a non-local identified as Amritpal Singh resident of Amritsar at Shaheed Gunj #Srinagar, who #succumbed to the injuries. One more person is grievously injured and evacuated for medical attention. Area has been #cordoned off. Further details shall follow.
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) February 7, 2024