Sunny Leone : अरे बाप रे… सनी लिओनीच्या खात्यात जमा होतात महतारी वंदना योजनेचे दरमहा 1000 रूपये, पतीचं नाव जॉनी सिन्स
Sunny Leone : छत्तीसगडमध्ये महतरी वंदन योजनेत मोठी फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ही योजना महिलांसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र छत्तीसगडमध्ये या योजनेच्या नावाखाली संबंधितांनी फसवणुकीची हद्द ओलांडली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये सनी लिओनीच्या नावावर महतरी वंदनाची रक्कम दरमहा 1000 रुपये जमा होत आहेत. तिच्या पतीचं नाव जॉनी सिन्स असं नमूद करण्यात आलं आहे. महतरी वंदन योजनेअंतर्गत, छत्तीसगड सरकार 21 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विवाहित किंवा विधवा महिलांना दरमहा 1000 रुपये देते. या योजनेच्या नोंदणीसाठी लाभार्थ्यांकडून आधारकार्ड, रेशनकार्ड आणि बँकेचे पासबुक घेतलं जातं आणि पडताळणीनंतर अंगणवाडी पर्यवेक्षकांकडून मान्यता दिली जाते.
इतकं सगळं असूनही, राज्यातील बस्तर जिल्ह्यातील हे प्रकरण चर्चेत आलं आहे, जिथे सनी लिओनीच्या नावावर दर महिन्याला खात्यात 1000 रुपये जमा होत आहेत. महतरी वंदन योजनेच्या वेबसाइटवर दिलेल्या नोंदणी क्रमांकावर सनी लिओनीचे नाव बरोबर आहे, परंतु त्या नावामागील सत्य काय आहे आणि त्यामागे कोणाचे आधार कार्ड आहे? आणि बँकेचे पासबुक कोणाचे आहे? कोणत्या अंगणवाडी सेविकेने फॉर्म भरला आणि कोणत्या पर्यवेक्षिकेने मान्यता दिली हा तपासाचा विषय आहे. आता तपासानंतरच खरी परिस्थिती कळेल. सनी लिओनी आणि जॉनी सिन्स हे परदेशातील प्रसिद्ध स्टार आहेत. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेचा विषय बनले आहे.
सरकारने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंतच पोहोचेल याची काळजी घ्यावी. तसेच जनतेच्या पैशाचा हा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. शेवटी या योजना सर्वसामान्यांसाठी आहेत की नावाच्या नावावर खिसे भरण्याचे साधन? असं जनता विचारत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विभाग काय कारवाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.