लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदानाचे दोन टप्पे संपले असून मतदानाचे 5 टप्पे बाकी आहेत. सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र, आता या निवडणुकीत कंडोमही चर्चेचा विषय बनला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी एका रॅलीत लोकसंख्या वाढीवर चर्चा करताना दावा केला की, मुस्लिम समुदायाचे लोक देशात सर्वाधिक कंडोम वापरतात.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) देशात मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला आहे. ओवेसी म्हणाले की, मुस्लिमांमधील लोकसंख्या वाढ आणि प्रजनन दर लक्षणीय घटला आहे. ओवेसी म्हणाले की, सरकारी आकडेवारी सांगते की देशातील पुरुषांमध्ये मुस्लिम सर्वात जास्त कंडोम वापरतात.
‣ @narendramodi की एक ही गारंटी है, दलितों और मुसलमानों से नफ़रत करो।
‣ एक मुल्क का वज़ीर-ए-आज़म इस मुल्क की 15 फ़ीसद अवाम को घुसपैठिया कहता है, इससे शर्मनाक बात कुछ और नहीं हो सकती। pic.twitter.com/87mIdAfiAi
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 27, 2024
ओवेसी म्हणाले की, नरेंद्र मोदी हिंदू बांधवांना भिती दाखवत आहेत. ते म्हणतात की, मुस्लिम लवकरच बहुसंख्यांक होतील. आमचा धर्म भलेही वेगळा असेल मात्र आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. अखेर ती द्वेषाची भिंत का उभी करत आहेत.
ओवैसी म्हणाले, द्वेषाची भिंत का उभी करत आहात? मुसलमान अधिक मुलं जन्माला घालतात, अशी भीती पसरवली जात आहे. मात्र केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर घसरला आहे. मुस्लिम लोक सर्वाधिक कंडोमचा वापर करतात, हे सांगतांना मला जराही संकोच वाटत नाही.