SRH vs CSK: धोनीच्या संघाचा सलग दुसरा पराभव! हैदराबादने 6 गडी राखत जिंकला सामना

WhatsApp Group

Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings: आयपीएल 2024 च्या 18 व्या सामन्यात शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 5 गडी गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 18.1 षटकांत 166 धावा केल्या आणि सामना 6 गडी राखून जिंकला.

हैदराबादची झंझावाती सुरुवात
166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 17 चेंडूत 46 धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी दीपक चहरने तोडली. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चहरने अभिषेक शर्माला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. अभिषेकने 12 चेंडूत 37 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले.

मार्करमची शानदार खेळी
ट्रॅव्हिस हेड आणि एडन मार्करम यांनी दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. महेश तीक्षानाने 10व्या षटकात हेडची विकेट घेतली. हेडने 24 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 31 धावांची खेळी खेळली. 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोईन अलीने एडन मार्करामला एलबीडब्ल्यू आऊट केले. मार्करामने 36 चेंडूत 50 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 1 षटकार आला. मोईन अलीने १६व्या षटकात शाहबाज अहमदला एलबीडब्ल्यू आऊट केले. शाहबाजने 19 चेंडूंचा सामना करत 18 धावा केल्या.

दुबेचे अर्धशतक हुकले
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जने 165 धावा केल्या. शिवम दुबेने सर्वाधिक 45 धावांची खेळी खेळली. यासाठी त्याने 24 चेंडूंचा सामना करत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यांच्याशिवाय अजिंक्य रहाणेने 35, रवींद्र जडेजाने 31 आणि रुतुराज गायकवाडने 26 धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, पॅट कमिन्स, शाहबाज अहमद आणि जयदेव उनाडकट यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.

चहलची पत्नी धनश्री वर्माचे नवीन गाणे रिलीज (Watch Video)