Shirdi Sai Baba : साई बाबांच्या भक्तांसाठी मोठी बातमी

WhatsApp Group

साईभक्तांसाठी एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. 1 मे ला कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे. या दिवशी सुट्टी असल्यामुळे तुम्ही शिर्डीमध्ये साई बाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जाणार असाल तर जाऊ नका. कारण, 1 मे पासून शिर्डीमध्ये बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे.

शिर्डीच्या साई मंदिरामध्ये आता सुरक्षेसाठी CIASFची सुरक्षा देण्यात येणार आहे. या सुरक्षेविरोधात येथील ग्रामस्थांकडून एल्गार पुकारण्यात आला आहे. ही सुरक्षा आली तर येथील ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो, यासाठी सीआयएसएफ सुरक्षेविरोधात ग्रामस्थांकडून बेमुदत बंदची हाक दिली आहे.