17 एप्रिल 2024 (बुधवार) रोजी राम नवमीचा पवित्र दिवस आहे. रामनवमीच्या दिवशी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांना सुट्टी असेल. सर्व राज्यांमध्ये ही सरकारी सुट्टी नसणार. काही निवडक शहरांमध्ये बँका बंद राहतील.
रामनवमीनिमित्त अहमदाबाद, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, रांची आणि बँकांमध्ये सरकारी सुट्टी असेल.
बँकांच्या सुट्ट्यांची यादी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) https://www.rbi.org.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. RBI ने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत सुट्ट्या आणि रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडेज अशा तीन श्रेणींमध्ये बँकांच्या सुट्ट्यांची विभागणी केली आहे.
तुमच्या शहरात राम नवमीच्या दिवशी जरी बँकेची शाखा उघडणार नाही. परंतु सर्व ग्राहक ऑनलाइन इंटरनेट आणि मोबाइल बँकिंगसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतील. पण तुमच्याकडे एखादे काम असेल जे बँकेत जाऊनच सोडवता येत असेल तर रामनवमीच्या सुट्टीपूर्वी ते निपटून काढावे.