Poonam Pandey Alive: पूनम पांडे जिवंत… व्हिडीओ शेअर करत म्हणाली – सॉरी

WhatsApp Group

Poonam Pandey: प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे जीवंत आहे, ज्याची माहिती तिने स्वतः दिली आहे. स्वत: अभिनेत्रीने तिच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. पूनमने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती जिवंत आहे आणि तिने असे का केले हे सांगितले आहे. चला जाणून घेऊया पूनमनेच तिच्या मृत्यूची खोटी अफवा का पसरवली?

शुक्रवारपासून सर्वत्र पूनम पांडेच्या निधनाची चर्चा होती. अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या निधनाची बातमी देण्यात आली. मात्र आता खुद्द अभिनेत्रीनेच तिचा व्हिडिओ शेअर करत आपण जिवंत असल्याचे सांगितले असून या व्हिडिओमध्ये पूनमने या कटामागील सत्यही उघड केले आहे. आता पूनमने पुढे येऊन आपण मृत नसल्याचे स्पष्ट केले आहे. व्हिडिओमध्ये, पूनमने असा युक्तिवाद केला की तिच्या मृत्यूची बातमी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी होती.

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मुलींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी

“मी जिवंत आहे. माझं निधन सर्वाइकल कॅन्सरने झालेलं नाही. दुर्दैवाने मी त्या हजारो महिलांबद्दल हे बोलू शकत नाही, ज्यांनी सर्वाइकल कॅन्सरमुळे आपले प्राण गमावले आहेत. ते या आजाराविषयी काही करू शकत नाही, असा प्रश्न नाही. पण नेमकं काय करावं हेच त्यांना माहीत नाही,” असं ती या व्हिडीओत म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

“मी तुम्हाला इथे हेच सांगण्यासाठी आले आहे की इतर सर्वाइकल कॅन्सर हे रोखू शकता येतं. हे कॅन्सरच्या इतर प्रकारांसारखं नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त टेस्ट करावी लागेल आणि एचपीव्ही (HPV) व्हॅक्सिन घ्यावी लागेल. सर्वाइकल कॅन्सरने आणखी कोणाचे प्राण जाऊ नये म्हणून आपण एवढं आणि यापेक्षा अधिक प्रयत्न नक्कीच करू शकतो,” असं पूनम पुढे म्हणाली.