जुनी पेन्शन मिळणार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

WhatsApp Group

मुंबई : मागील 7 दिवसांपासून चालू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठीचा बेमुदत संप अखेर मागे घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते विश्वास काटकर यांच्याकडून करण्यात आली आहे.

गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेला हा संप आता संपला असून, मंगळवारपासून सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यास सांगितले आहे. राज्य  सरकारसोबतच यशस्वी चर्चा केल्यानंतर राज्यात जुनी पेन्शन योजना निश्चित सुरू होईल असा विश्वास राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते काटकर यांनी व्यक्त केला आहे. जुनी पेन्शन योजना पू्र्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्यानेत सर्व संपकरी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.