Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

WhatsApp Group

Makar Sankranti Wishes In Marathi : मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. मकर संक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायण देखील म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान, व्रत करणं, कथा वाचन, दान करणे आणि सुर्याची उपासना करण्याला महत्त्व दिलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवतात. आम्ही या पोस्टमध्ये काही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा Makar Sankranti Wishes देत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना पाठवू शकता.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….

म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला….
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा

नवीन वर्षाच्या,
नवीन सणाच्या,
प्रिय जणांना,
गोड व्यक्तींना,
” मकर संक्रांतीच्या ”
सर्वांना गोड गोड शुभेच्या !!

आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे .
तिळगुळ घ्या गोड़ बोला

नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

झाले गेले विसरून जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलू
संक्रांतीच्या­ हार्दीक शुभेच्छा

आठवण सूर्याची
साठवण स्नेहाची
कणभर तीळ
मनभर प्रेम
गुळाचा गोड़वा स्
नेह वाढवा
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…….!!
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
“मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा”

साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला

तिळात मिसळला गुळ,
त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!