Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये मतदान केंद्रे बनवली आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. मतदानाच्या दिवशी अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी असेल. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 102 जागांवर मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात या जागांवर निवडणुका होणार आहेत
अरुणाचल प्रदेश-2
आसाम-5
बिहार-4
छत्तीसगड-1
मध्य प्रदेश-6
महाराष्ट्र-5
मणिपूर-2
मेघालय-2
मिझोराम-1
नागालँड-1
राजस्थान-12
सिक्कीम-1
तामिळनाडू-३९
त्रिपुरा-1
उत्तर प्रदेश-8
उत्तराखंड-5
पश्चिम बंगाल-3
अंदमान निकोबार बेटे-1
जम्मू-काश्मीर-1
लक्षद्वीप-1
पाँडिचेरी-1
यूपीमध्ये या ठिकाणी शाळा बंद राहतील
उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर, कैराना, मुझफ्फरनगर, बिजनौर, नगीना, मुरादाबाद, रामपूर आणि पिलीभीतमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे येथील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असेल. याबाबत स्थानिक प्रशासनाने आधीच घोषणा केली आहे.
शाळा कुठे-कुठे बंद राहणार?
बिहारमध्ये औरंगाबाद, गया, नवादा आणि जमुईमध्ये सर्व शाळा बंद राहतील. त्याचवेळी महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर येथील सर्व शाळा बंद राहणार आहेत. मध्य प्रदेशातील दमोह, खजुराहो, सतना, रीवा, होशंगाबाद आणि बैतुल येथेही शाळा बंद राहतील. राजस्थानमध्ये गंगानगर, बिकानेर, चुरू, झुंझुनू, सीकर, जयपूर ग्रामीण, जयपूर, अलवर, भरतपूर, करौली-धौलपूर, दौसा आणि नागौरमध्येही शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. त्याचबरोबर तामिळनाडूतील सर्व जिल्ह्यांमध्ये 19 एप्रिल रोजी शाळा बंद राहतील.
या राज्यांव्यतिरिक्त 19 एप्रिलला जिथे जिथे निवडणुका होत आहेत तिथे शाळा बंद राहतील. सार्वजनिक सुट्टीही असेल. यामध्ये ईशान्येकडील राज्यांचाही समावेश आहे.