
अनेक घरांमध्ये आजही तुम्ही आजी-आजोबा किंवा वडिलधाऱ्या मंडळींना ध्यान करताना पाहिलं असेल. आता प्रत्यक्षात पाहताना ध्यान करणारी व्यक्ती फक्त मांडीवर हात ठेऊन डोळे मिटून बसलेली असते. त्यामुळे अनेकदा हे काय नुसतं बसणं असा प्रश्न या ज्येष्ठ मंडळींना विचारला जातो. परंतु, तुम्हाला खरंच ध्यान करणं म्हणजे काय माहित आहे का? ध्यान करणं म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं नव्हे. तर, आपल्या अस्वस्थ आणि सतत बडबड करणाऱ्या मनाला शांत करणे.
एखादा दिवस तुम्ही कोणाशीही बोलला नसाल. पण, तुम्ही मनातल्या मनात स्वत:शीच हजारो गप्पा मारत असतात. आपण सगळेच आपल्या मनाशी खूप बोलत असतो. मात्र, त्या मनालादेखील शांत करण्याची गरज असते. त्यामुळेच ध्यान करणं अत्यंत गरजेचं आहे. ध्यान केल्याने केवळ अस्वस्थ मन शांतच होतं असं नाही. तर, त्याचसोबत त्याचे अन्यही काही फायदे आहेत. हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
ध्यान करण्याचे 8 फायदे :
- वर्तमानात फोकस करण्यासाठी
- आत्म-जागरूकता वाढविण्यासाठी
- तुमच्या तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी
- नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करण्यासाठी
- संयम वाढविण्यासाठी
- रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित राखण्यासाठी
- झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी