सध्या राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यात काही ठीकाणी तक गारांचा पाऊस पडत असल्याने शेतकरी राजा पुरता हैराण झाला आहे. आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडला असेल या गारा नेमक्या आकाशातून पडतात तरी कशा? त्या गारा तयार तरी कशा होतात. या प्रश्नाचं उत्तक आज आपण जाणून घेणार आहोत.
गारांचा पाऊस शेतीला खूप हानिकारक ठरू शकतो. लहान आकारांपासून ते क्रिकेटमध्ये वारल्याा जाणाऱ्या बॉल एवढ्या आकाराच्या गारा असू शकतात. आकाशातून गारांच्या पडण्याचा वेग एवढा असतो की काचाही फुटी शकतात आणि माणसही जखमी होऊ शकतात. गारांचे तीन प्रकार आढळतात.
१) पाढऱ्या गोट्यांच्या आकाराच्या गारा – या गारा मऊ असतात. त्यांचा बोटांनीही आपल्याला चुरा करता येतो.
२) मध्यम आकाराच्या गारा – या गारा शुद्ध बर्फाच्या बनलेल्या असतात.
३) मोठ्या आकाराच्या गारा – या गारांचा रंग दुधासारखा असतो. या गारा फोडल्या की त्यांमध्ये कांद्यासारखे विविध थर आढळून येतात.
प्रचंड आकाराच्या क्युम्युलोनिंबस ढगांमधून गारांचा पाऊस पडतो. अशा ढगाचा तळ भूपृष्ठापासून सुमारे ६०० मीटर तर माथा १०,००० मीटर अंतरावर असतो. हा ढग बहुतांश अतिशीत थंड पाण्याच्या थेंबांचा बनलेला असतो. खाली पडणारा बर्फांचा हा लहानसा गोळा पाण्याचे थेंबसोबत घेतो आणि पाणी लगेच गोठून गेल्याने त्या लहानश्या बर्फाच्या कणावर एकास-एक पाण्याचा थर जमून तो मोठा होतो.
खालून येणार्या वाऱ्यांनी हा कण वर फेकला जातो. वर जाताना त्याच्यावर अधिकाधिक पाण्याचे थेंब गोठले जातात. अशा प्रकारे वरून खाली आणि खालून वर जात असताना मूळ बर्फाच्या कणावर गोठलेल्या पाण्याचे अनेक थर जमा होतात. या चक्राची अनेकंदा पुनरावृत्ती झाली की मूळ बर्फाचा कण खूप मोठा होतो आणि तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने भूपृष्ठाकडे फेकला जातो आणि जमिनीवर गारांचा पाऊस पडतो
गिनीज बुक रेकॉर्डनूसार १४ एप्रिल १९८६ रोजी बांगलादेशात गोपालगंज भागात गारांचा पाऊस पडल्याने ९२ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद गिनीज बुक रेकॉर्डमध्ये आहे. नोंदीनूसार सर्वात जड गारांचे वजन १ किलो पर्यंत होते.