Kanika Mann: ‘हा’ बोल्ड फोटो पाहू नये म्हणून अभिनेत्री कनिका मानने वडिलांना केले इन्स्टाग्रामवर केले ब्लॉक

दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या ‘खतरों के खिलाडी’च्या १२ व्या पर्वाच्या शूटिंगला दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन सुरु झाली आहे. या पर्वात अभिनेत्री कनिका मान देखील सहभागी झाली आहे. कनिका मान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण स्विमसूटमधील फोटो शेअर करण्यासाठी वडिलांना ब्लॉक केल्याचं कनिकाने सांगितले आहे.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कनिकाने या याबाबत सांगितले आहे. “मी माझ्या बहिणीला ब्लॉक केलं नव्हतं. तिला माझे इन्स्टाग्रामवरील फोटो दिसत होते आणि तेव्हा वडिलांनी तिला विचारलं की मला कनिकाचे फोटो का दिसत नाहीत? माझ्या बहिणीने त्यांना कसंबसं समजावलं की ती फारसे फोटो अपलोड करत नाही. तरीसुद्धा ते तिला विचारत होते की त्यांना माझ्या अकाऊंटवरील फोटो का दिसत नव्हते.
View this post on Instagram
त्यांना इन्स्टाग्रामच्या फिचर्सबद्दल फारशी माहिती नाही. येत्या काही दिवसांत ऑन एअर जाईल. तेव्हा मी त्यांचा सामना कसा करेन हे मलाच माहित नाही.असं कनिकाने मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे.