RCB vs PBKS: बंगळुरूने पंजाबचा 4 विकेट्सनी केला पराभव, विराट-कार्तिकची दमदार खेळी
RCB vs PBKS: आयपीएल 2024 चा सहावा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच होळीच्या दिवशी सामना खेळला गेला आणि या खास प्रसंगी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली आपल्या संघाच्या विजयाचा हिरो ठरला होता.
या सामन्यात पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हे लक्ष्य 19.2 षटकांत पूर्ण केले. विराटने आरसीबीसाठी सर्वात मोठी खेळी खेळली. विराटने 49 चेंडूत 77 धावा केल्या. यानंतर दिनेश कार्तिकने 10 चेंडूत नाबाद 28 धावा करत सामना संपवला. दिनेश कार्तिकशिवाय महिपाल लोमरोरनेही 8 चेंडूत नाबाद 17 धावा केल्या.
IPL 2024 Full Schedule: आयपीएल 2024चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; अंतिम सामना कुठे?
DK Boss, our finisher supreme 🫡#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RCBvPBKS
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 25, 2024
आरसीबीच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली
पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर जितेश शर्माने 27 धावांची खेळी केली. याशिवाय शशांक सिंगने 8 चेंडूत 21 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. दुसरीकडे, आरसीबीकडून मोहम्मद सिराज-ग्लेन मॅक्सवेलने 2-2 बळी घेतले. अल्झारी जोसेफ आणि यश दयाल यांनाही प्रत्येकी 1 बळी मिळाला.
First W of the season. We open the account with 2 points. 🙌#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RCBvPBKS pic.twitter.com/jZJfpEISEp
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 25, 2024
या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. आरसीबीने आतापर्यंत 2 पैकी एक सामना जिंकला आहे. या पराभवासह पंजाब किंग्ज पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
रोहित शर्माकडून सर्वांना ‘हॅप्पी होळी! मुंबईच्या खेळाडूंना भिजवलं, पहा व्हिडिओ