IPL 2023: चाहत्यांसाठी गुड न्यूज, आयपीएल 2023 ‘या’ तारखेपासून सुरू होईल!

WhatsApp Group

क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएलच्या तारखांची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते. बीसीसीआय आयपीएल 2023च्या आयोजनाकडे अधिकाधिक लक्ष देत आहे. असे मानले जात आहे की आयपीएल 2023 1 एप्रिलपासून सुरू होईल, तर या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 28 मे रोजी खेळवला जाऊ शकतो. यावेळी आयपीएलचे वेळापत्रक लहान असेल. त्यामागचे कारण म्हणजे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC Final) ची विजेतेपदाची लढत 8 जूनपासून ओव्हलवर सुरू होणार आहे. यामुळेच बीसीसीआयला आयपीएलचे वेळापत्रक थोडे कमी करावे लागले आहे.

आयपीएल 2023 58 दिवस चालणार 
मिळालेल्या माहितीनुसार, आधीचे आयपीएल सामने 74 दिवसांचे खेळवले जाणार होते, पण आता आयपीएल 2023 केवळ 58 दिवसांचे असतील. अहवालांवर विश्वास ठेवला तर, IPL 2023 चे अंतिम वेळापत्रक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ते म्हणाले ‘सध्या, मे महिन्याच्या अखेरीस आयपीएल पूर्ण करण्याचा विचार आहे, कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून आयपीएल सुरू व्हायला हवे. ही कल्पना आहे.क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएलच्या तारखांची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते. बीसीसीआय आयपीएल 2023 च्या आयोजनाकडे अधिकाधिक लक्ष देत आहे. आयपीएल 2023 1 एप्रिलपासून सुरू होईल, तर या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 28 मे रोजी खेळवला जाऊ शकतो.