Ratan Tata Passes Away नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.
रतन टाटा नीतिसाठी ओळखले जातात. IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये ते 421 व्या क्रमांकावर होते. 2022 मध्ये त्यांची निव्वळ संपत्ती 3,800 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
मागील वर्षी ते 3,500 कोटी रुपयांसह 433 व्या क्रमांकावर होते. रतन टाटा यांची संपत्ती कमी असण्याचे कारण म्हणजे टाटा सन्स या होल्डिंग कंपनीच्या अंतर्गत टाटा ट्रस्ट्स, संस्थांनी केलेल्या एकूण कमाईपैकी 66 टक्के धर्मादाय कार्यांसाठी योगदान देते.
यामुळेच 3,800 कोटी रुपये त्यांची संपत्ती आहे. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सुनी टाटा आहे. रतन टाटा यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. शिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी विदेशात शिक्षण घेतले.