भारतीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला 231 धावांचे लक्ष्य दिले आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा डाव 420 धावांवर संपला. संघाकडून ओली पोपने सर्वाधिक 196 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले.
दुसऱ्या डावात इंग्लंडला सुरुवातीलाच धक्के बसले. 163 धावांपर्यंत संघाचे 5 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. नंतर पोपने एक टोक सांभाळले आणि त्याच्या खेळीमुळे संघाला चांगली धावसंख्या गाठता आली. पोपशिवाय इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही. बेन फॉक्सने 81 चेंडूंचा सामना करत 34 आणि रेहान अहमदने 28 धावा केल्या.
Entered their second innings trailing by 190
Buzzing, England fans? #INDvENG pic.twitter.com/hFIbowQmi6
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 28, 2024
पोपने बेन डकेटसोबत 57 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने फॉक्ससोबत सहाव्या विकेटसाठी 183 चेंडूत 112 धावा जोडल्या. पोपने रेहानसोबत 95 चेंडूत 64 धावांची भागीदारी केली. त्याने इंग्लंडसाठी पाचवे आणि भारतीय संघाविरुद्ध पहिले शतक झळकावले. पोपने 278 चेंडूंचा सामना करत 196 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 21 चौकार आले.
A special reception for a very special innings 👏 ❤️
Loving that grin, @OPope32 😁 #INDvENG | #EnglandCricket pic.twitter.com/OTTU3oSRX4
— England Cricket (@englandcricket) January 28, 2024
रूटने हा विक्रम आपल्या नावावर केला
जो रूटला दोन्ही डावात विशेष काही करता आले नाही. मात्र, दुसऱ्या डावात त्याने मोठा विक्रम केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला मागे टाकले. पाँटिंगने भारताविरुद्धच्या 29 कसोटी सामन्यांमध्ये 2555 धावा केल्या होत्या. रूटने 26 कसोटी सामन्यात 2,557 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या बॅटने 9 शतके आणि 10 अर्धशतकेही केली आहेत.
इंग्लंडचा पहिला डाव
इंग्लंडने पहिल्या डावात 64.3 षटके फलंदाजी केली आणि केवळ 246 धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्सने 70 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 88 चेंडूंचा सामना केला आणि 6 चौकारांसह 3 षटकार ठोकले. त्याच्याशिवाय इतर कोणीही फलंदाजी करताना मोठा डाव खेळू शकला नाही. भारतीय संघाकडून अश्विन आणि रवींद्र जडेजाने 3-3बळी घेतले. अक्षर पटेल आणि बुमराहच्या खात्यात 2-2 विकेट जमा होत्या.