holi color removing tips: होळीच्या रंगांना अजिबात घाबरू नका, या टिप्सच्या मदतीने काढा चेहऱ्यावरचा जिद्दी रंग
केस आणि त्वचेला नुकसान होणार म्हणून बहुतेक लोक होळीत रंग खेळणे टाळतात. त्यांची भीतीही रास्त आहे कारण होळीचे रंग जर जिद्दी असतील तर ते काढणे फार कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत त्वचा आणि केस दोघांचीही अवस्था बिकट होते. पण यंदा काहीही विचार न करता होळी जोमाने खेळा कारण आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही होळीचा रंग उतरवू शकता holi color removing tips. या वर्षी होळी ८ मार्चला साजरी होणार आहे.
त्वचेवरील रंग अशा प्रकारे काढून टाका
1. होळी खेळल्यानंतर प्रथम चेहरा स्वच्छ पाण्याने वारंवार धुवा आणि नंतर क्लींजिंग क्रीम किंवा लोशन लावा. काही वेळाने ओल्या कापसच्या मदतीने स्वच्छ करा. डोळ्यांच्या सभोवतालची जागा हलक्या हाताने स्वच्छ करायला विसरू नका. क्लिंजिंग जेल चेहऱ्यावर जमा झालेले रंग काढून टाकण्यासाठी खूप मदत करते.
2. तुम्ही होम मेड क्लिन्जरच्या मदतीने होळीचा रंग काढू शकता. हे करण्यासाठी अर्धा कप थंड दुधात ऑलिव्ह, तीळ किंवा कोणतेही वनस्पती तेल मिसळा. आता त्वचेवर जिथे रंग असेल तिथे हे मिश्रण कापसाच्या मदतीने लावा आणि स्वच्छ करा. तिळाच्या तेलाने मसाज करून त्वचेचा रंग सहज काढता येतो.
3. बेसनाच्या फेस पॅकच्या मदतीनेही होळीचे रंग काढता येतात. यासाठी एका भांड्यात दोन चमचे बेसन, एक चमचा हळद आणि एक चमचा मलई एकत्र करून नीट मिक्स करा. आता ही पेस्ट तुमच्या त्वचेवर लावा आणि कोरडे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
होळीच्या रंगांपासून केस कसे वाचवायचे
1. होळी खेळण्यापूर्वी केसांना हेअर सीरम किंवा कंडिशनर लावा. यामुळे गुलालाच्या रंगांमुळे होणार्या कोरडेपणापासून केसांचे संरक्षण होईल.
2. थोडेसे हेअर क्रीम घेऊन दोन्ही तळहातांवर पसरवा आणि केसांना हलके मसाज करा. किंवा होळीचे रंग जाण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही केसांना खोबरेल तेल लावू शकता.
3. होळी खेळल्यानंतर केस शॅम्पूने चांगले धुवा. यानंतर केसांना कंडिशनर लावा, नंतर केस पाण्याने स्वच्छ करून हेअर सीरम लावा. या उपायाने तुमच्या केसांमधील कोरडेपणा दूर होईल.
(हा लेख सामान्य माहितीसाठी आहे, कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)