Hartalika Teej 2024 Muhurat : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिकेचे व्रत केले जाते. निर्जला व्रत करून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. जाणून घ्या या वर्षी हरतालिका पूजनाचा मुहूर्त आणि पूजा पद्धत.
हरितालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:22 वाजता तृतीया तिथी सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी पहाटे 03:01 वाजता समाप्त होईल. 6 सप्टेंबर रोजी उदया तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.01 ते 08.32 पर्यंत असेल.
हिंदू पंचांगानुसार, 06 सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या हरितालिकेची व्रत असणार आहे. देशातील अनेक भागांत हरितालिकेचे हे व्रत पाळले जाते. हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते.
हरतालिका पूजा साहित्य
वाळू, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरी फुलं, वस्त्र, तसंच सोळा झाडांची प्रत्येकी १६ पानं पुजेसाठी फुलं, तसंच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत, चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी,आरसा इत्यादी.
हरतालिकेसाठी निर्जला व्रत महत्वाचे आहे. माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे जंगलात जप, तपश्चर्या आणि ध्यान केले. त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे उपवास करताना चुकूनही अन्न ग्रहण करू नका. निर्जळी उपवास करणे शक्य नसेल तर फक्त फळे खा, इतर काहीही खाऊ नका.
हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळा रंग टाळावा. काळ्या बांगड्या आणि कपडे घालणे टाळावे. काळा रंग अशुभतेचे प्रतिक आहे.
या दिवशी महिलांनी चुकूनही घरातील मोठ्यांचा अपमान करू नये. कोणाशीही बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत.