Kartiki Ekadashi Wishes| कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

WhatsApp Group

विठ्ठलभक्तांसाठी पर्वणी असलेल्या दोन मुख्य महाएकादशी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजऱ्या केल्या जातात. त्यातील एक असते आषाढ महिन्यातील आषाढी एकादशी आणि दुसरी असते कार्तिकी एकादशी…आषाढी एकादशी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते तर कार्तिकी एकादशीचा उत्सव आळंदीत रंगतो. थोडक्यात आषाढीला जसे वारकरी पायी वारी करत पंढरपूरला जमा होतात तसाच वारकऱ्यांचा मेळा कार्तिकीला आळंदीत जमा होतो. या दोन्ही एकादशी म्हणजे विठ्ठल भक्तांची मांदीयाळी असते. विठ्ठल नामघोषात आणि अभंगाच्या तालावर पंढरी आणि आळंदी अक्षरशः दुमदुमून निघते. कार्तिकी आणि एकादशीला वारकऱ्यांच्या आनंदाला पारावरच नसतो. विठ्ठल भक्त पांडूरंगाच्या नामघोषात इतके रंगतात की त्यांना त्यांच्या आयुष्यातील सुखदुःखाचा सहज विसर पडतो. या दोन्ही एकादशीच्या दिवशी सर्व वातावरणच जणू भक्तीमय आणि मंगलमय होतं. कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिक एकादशी म्हणून ओळखली जाते. काहीजण या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असंही म्हणतात. या एकादशीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्हाला कार्तिक एकादशी चे महत्व (kartiki ekadashi information in marathi) माहीत असायला हवं. अशा पवित्र वातावरणात तुमच्या प्रियजनांना द्या या विठ्ठलमय कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

1.कार्तिकी एकादशीच्या सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा!!!

2.कार्तिकी एकादशीनिमित्त सर्वांना विठ्ठलमय शुभेच्छा!

3.बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल|, करावा विठ्ठल जीवभाव||, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

4.सुंदर ते ध्यान उभे विटेवरी|, कर कटावरी ठेवोनियां||, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

5.रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी| तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरावा|| बहुत सुकृताची जोडी, म्हणुनि विठ्ठल आवडी| सर्व सुखांचे आगर, बाप रखुमादेवीवर|| कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!!!

6.विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली रे… कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

7.भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तु आम्हा  लेकरांची विठुमाऊली…. कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

8.पंढरीसी जावे ऐसे माझे मनी विठाई जननी भेटे केव्हा… कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा! सावळे सुंदर, रूप मनोहर| राहो निरंतर ह्रदयी माझे|| कार्तिकी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

9. कानडा राजा पंढरीचा…कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

5. पाणी घालतो तुळशीला वंदन करतो देवाला सदा आनंदी ठेव माझ्या कुटुंबाला हीच प्रार्थना करतो पांडुरंगाला|| कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!