Google Play Store: गुगलचा मोठा निर्णय; प्ले स्टोरमधून काढून टाकले हे 10 भारतीय ऍप्स

WhatsApp Group

सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी गुगलकडून वेगवेगळी पावले उचलली जातात. पण यावेळी प्रकरण वेगळे आहे. गुगलने भारतातील 10 कंपन्यांचे ॲप काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. यात काही लोकप्रिय मॅट्रिमोनी ॲप्स देखील आहेत. ही बाब सेवा शुल्क न भरण्याबाबत आहे. यामुळेच आता टेक कंपनीने हे ॲप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचं म्हणजे हे शुल्क गुगलने लादू नये, अशी स्टार्टअपची इच्छा होती. गुगलची रक्कम न भरल्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले होते. स्टार्टअप्सना ऍपमधील पेमेंट थांबवायचे होते. मात्र गुगलने आता याला हिरवा सिग्नल दिला आहे. अशा परिस्थितीत, स्टार्टअप्सना शुल्क भरावे लागेल किंवा त्यांचे ऍप काढून टाकले जात आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेशही दिले आहेत. यावर न्यायालयाने स्टार्टअपला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.