गौतम अदानींनी ‘मातोश्री’वर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण

WhatsApp Group

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे 39 समर्थक आमदार हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष अडचणीत आला आहे. 40 आमदार आणि 12 खासदार शिवसेनेमधून बाहेर पडल्यामुळे शिवसेना कशी वाचवायची हा प्रश्न आता उद्धव ठाकरेंसमोर आहे. याचदरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आहे.

गौतम अदानींच्या उद्धव ठाकरे भेटीचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाली. या दोघांची भेट कोणत्या विषयावर झाली होती, हे अजून समोर आलेलं नाही. दोघांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा