आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात; 2 ट्रेनची टक्कर, 8 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी
आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रेनची धडक झाली आहे. या धडकेमुळे पॅसेंजर ट्रेनही रुळावरून घसरली. या घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो. तसेच अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Andhra Pradesh Train Accident: आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. याठिकाणी दोन गाड्यांची टक्कर झाली असून त्यामुळे पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 32 जण जखमी झाले आहेत. रुळावरून घसरलेली पॅसेंजर ट्रेन विशाखापट्टणमहून रायगडाकडे जात होती.
या प्रकरणी जिल्हाधिकारी एस. नागलक्ष्मी यांनी सांगितले की, विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 32 जण जखमी झाले आहेत. जखमींना विशाखापट्टणम आणि विजयानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि एसपी एम. दीपिका आणि मंत्री बोट्सा सत्यनारायण घटनास्थळी पोहोचले आहेत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
विशाखाहून पलासाकडे जाणारी विशेष पॅसेंजर ट्रेन कोठावलसा विभागातील अलमांडा-कंटकपल्ली येथे सिग्नलअभावी रुळांवर थांबवण्यात आली. त्याचवेळी मागून येणारी विशाखा-रायगडा गाडी पॅसेंजर ट्रेनला धडकली.
#WATCH | Andhra Pradesh train accident | Rescue operations underway
6 people died and 18 injured in the Andhra Pradesh train accident: Deepika, SP, Vizianagaram pic.twitter.com/x2Rx13mfXf
— ANI (@ANI) October 29, 2023
रेल्वे बोर्ड ग्रुपमधील डीआरएम सौरभ प्रसाद यांनी रेल्वे अपघाताबाबत माहिती दिली. रुळावरून घसरल्याच्या घटनेचा तपशील गोळा केला जात आहे. बचाव पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाल्याचे डीआरएम यांनी सांगितले. या अपघातात 3 डबे रुळावरून घसरले आहेत. गाड्यांच्या धडकेमुळे घटनास्थळी विजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर अंधारमय झाला होता. अंधारामुळे बचावकार्यातही अडचणी येत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी परिस्थिती गंभीर आहे.
ईस्ट सेंट्रल रेल्वे सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, जखमी झाल्याची नोंद झाली आहे, परंतु आकडा अद्याप समजलेला नाही. या अपघातात दोन गाड्यांचा समावेश आहे. बचाव आणि जीर्णोद्धार प्रक्रिया सुरू आहे. एकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.
#WATCH | Andhra Pradesh train accident: Visuals of the rescue operations.
6 people died and 18 injured in the train accident: Deepika, SP, Vizianagaram. pic.twitter.com/ylThIFkh76
— ANI (@ANI) October 29, 2023
आंध्र प्रदेशच्या सीएमओकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी तात्काळ मदत उपायांचे आणि विझियानगरमच्या जवळच्या जिल्हे विशाखापट्टणम आणि अनकापल्ले येथून शक्य तितक्या रुग्णवाहिका पाठवण्याचे आदेश दिले आहेत. चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये योग्य व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जखमींना लवकरात लवकर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीस आणि महसूलसह अन्य विभागांशी समन्वय साधण्याचे आदेशही जारी केले आहेत.
#WATCH | Drone visuals of the train collision in Vizianagaram, Andhra Pradesh. Rescue operations underway pic.twitter.com/ou24l03HP1
— ANI (@ANI) October 30, 2023
केंद्र सरकार-राज्य सरकारकडून नुकसान भरपाई जाहीर
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये, गंभीर दुखापतींसाठी 2 लाख रुपये आणि किरकोळ दुखापतींसाठी 50,000 रुपये अनुदान दिले जाईल.
त्याचवेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करत नुकसानभरपाईची घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अधिकृत प्रसिद्धीनुसार, त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि इतर राज्यांतील जखमींना 50,000 रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली.
#WATCH | Andhra Pradesh train accident: Rescue operations continue in Vizianagaram district.
As per the data, 9 casualties are there and 29 people have been injured: Biswajit Sahu, CPRO, East Coast Railway. pic.twitter.com/vTT5808GhE
— ANI (@ANI) October 30, 2023
विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरील हेल्पलाइन क्रमांक
रेल्वे क्रमांक-
83003
83004
83005
83006
बीएसएनएल क्रमांक
08912746330
08912744619
एअरटेल क्रमांक
8106053051
8106053052
बीएसएनएल
8500041670
8500041671
भरपाईची घोषणा
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. रेल्वे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी उचललेल्या पावलांची माहिती मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना दिली. मृतांना 10 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. इतर राज्यातील लोकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना 20 हजार रुपये मिळतील. गंभीर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.