कॉंग्रेसच्या उमेदवाराने प्रचारादरम्यान वाटले पैसे, व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान ‘पैसे’ वाटल्याचे प्रकरण समोर आले आहे. तामिळनाडूमधील लोकसभेच्या सर्व 39 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत. त्याआधी, राज्यातील मदुराई जिल्ह्यातील विरुधुनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेस उमेदवार मणिकम टागोर यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान लोकांमध्ये ‘पैसे’ वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे विरुधर नगरचे उमेदवार मणिकम टागोर यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान पैसे वाटप करण्यात आले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये, मणिकम टागोर हे विरुधुनगरमधील निवडणूक प्रचार कार्यक्रमात उपस्थित लोकांना पैसे वाटप करताना दिसत होते. पोलीस अधीक्षक बीके अरविंद यांनी सांगितले की, काँग्रेस उमेदवार मणिकम टागोर यांची मदुराईमध्ये रोख वाटप करतानाची व्हिडिओ क्लिप खरी आहे. बुधवारी, टागोर यांनी मदुराई येथे निवडणूक प्रचारादरम्यान पक्ष समर्थक आणि स्थानिकांना संबोधित केले होते.