मोदी सरकारचा मोठा निर्णय, 25 जून ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित

WhatsApp Group

केंद्र सरकारने 25 जून हा संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत सरकारने राजपत्रात अधिसूचनाही जारी केली आहे. गृहमंत्री शाह यांनी ट्विटरवर लिहिले की, 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हुकूमशाहीचा वापर केला आणि देशात आणीबाणी लागू केली. हुकूमशाही मानसिकता दाखवून त्यांनी भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा दाबला, असे शाह म्हणाले. आणीबाणीच्या काळात देशात लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकण्यात आले. माध्यमांचा आवाजही त्यांनी दाबला.

अमित शहा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या निर्णयाचा उद्देश हुकूमशाही सरकारचा छळ आणि अत्याचार सहन करत लोकशाही पुनरुज्जीवित करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लाखो लोकांचा सन्मान करण्याचा आहे. संविधान हत्या दिन प्रत्येक भारतीयाच्या मनात लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणाची अमर ज्योत तेवत ठेवेल.