16 वर्षांच्या मुलानं इतिहास रचला, वडील अँड्र्यू फ्लिंटॉफचाच 27 वर्ष जुना विक्रम मोडीस काढला

WhatsApp Group

इंग्लंडचा दिग्गज खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा क्रिकेटमध्ये त्याच्या पुढे जाण्याची तयारी करत आहे. खरंतर, रॉकी फ्लिंटॉफने देशांतर्गत क्रिकेटमध्ये इंग्लंड लायन्सकडून खेळताना शतक झळकावले आहे. तो आता या संघासाठी शतक करणारा इतिहासातील सर्वात तरुण फलंदाज बनला आहे. रॉकीने १६ व्या वर्षी २९१ धावा करत इंग्लंड लायन्सकडून क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्ध शतक झळकावले. यापूर्वी हा विक्रम त्याचे वडील अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्या नावावर होता, ज्यांनी २० वर्षे आणि २८ दिवसांच्या वयात इंग्लंड लायन्ससाठी शतक ठोकले होते.

वडिलांचा विक्रम मोडला

या सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनने प्रथम फलंदाजी करत २१४ धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंड लायन्स संघाने ७ विकेट गमावून १६१ धावा केल्या. अशा परिस्थितीत, रॉकी फ्लिंटॉफ नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि येताच त्याने वेगाने धावा काढायला सुरुवात केली. त्याने फ्रेडी मॅककेनसोबत ६६ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. फ्रेडीने ५१ धावा केल्या, पण रॉकी फ्लिंटॉफला थांबावेसे वाटले नाही. त्याने १२७ चेंडूत १०८ धावा केल्या. या डावात त्याने ९ चौकार आणि ६ षटकारही मारले.

रॉकी फ्लिंटॉफच्या १०८ धावांच्या खेळीमुळे इंग्लंड लायन्सने पहिल्या डावात ३१६ धावा केल्या आणि १०२ धावांची मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनने त्यांच्या दुसऱ्या डावात १ विकेट गमावून ३३ धावा केल्या आहेत आणि ते अजूनही इंग्लंड लायन्सपेक्षा ६९ धावांनी मागे आहेत.

रॉकी फ्लिंटॉफला गेल्या महिन्यातच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडच्या अंडर-१९ संघात खेळण्याची संधी मिळाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये तो इंग्लंड अंडर-१९ क्रिकेटच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज बनला. रॉकी उजव्या हाताने जलद गोलंदाजी देखील करतो.