मुंबईतील अंधेरी परिसरात सोमवारी पहाटे एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला. अंधेरी पूर्व येथील साकी नाका मेट्रो स्टेशनजवळील इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेला मुंबईतील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. राजावाडी रुग्णालयाचे डॉ. वैकुळे यांनी सांगितले की, २२ वर्षीय राकेश गुप्ता याला रुग्णालयात आणले होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत राकेश गुप्ता हे त्याच दुकानात काम करायचे. बीएमसी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत दुकानात ठेवलेल्या विजेच्या तारा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि हार्डवेअरचा मोठा साठा जळून खाक झाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. मुंबई अग्निशमन दलाने याचे वर्णन लेव्हल-1 आग असे केले आहे.
Fire in Electric & hardware shop Near Sakinaka Metro Station,
Andheri (E).One man died in a fire that broke out at an electronics and hardware store#Mumbai#sakinaka@mybmc @MumbaiPolice pic.twitter.com/Gqd8tSW1cg
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) March 27, 2023
दुकानाला आग लागल्यावर दोन ते तीन जण त्यात अडकले होते. नंतर त्यांची सुटका करून आग आटोक्यात आणली. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेसीबीच्या साहाय्याने दुकानाचा पुढील भाग पाडण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दल, बीएमसीचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी हजर आहेत.