Yoga Day 2024: योगा करणे हा आता ट्रेंड (Yoga Trend) बनत चालला आहे. तरीही लोकांच्या मनात योगाबद्दल अनेक समज-गैरसमज (Yoga Misconceptions) आहेत. या पुराणकथांमुळे लोक अनेकदा योगा करणे टाळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या मिथकांबद्दल (Yoga myths) संपूर्ण माहिती देणार आहोत. या लेखाद्वारे काय योग्य आणि काय गैरसमज हे तुमच्या लक्षात येईल.
1) योगा फक्त हिमालयात केला जातो
योगा करण्यासाठी हिमालय हेच योग्य ठिकाण आहे असा अनेकांचा गैरसमज असतो. परंतु योगासने कुठेही करता येतात. मग ते घर असो, बाग किंवा जिम. मात्र जर तुम्हाला योगाविषयी सखोल अब्यास करायचा सेल तर तुम्ही हिमालयापर्यंत जाऊ शकतात. कारण योगाचा उगम हिमालयात आहे.
2) योगा प्रत्येकासाठी नाही
योगा प्रत्येकासाठी नाही,असा एक गैरसमज आहे. परंतु वय, तंदुरुस्ती आणि अनुभव यांची पर्वा न करता प्रत्येकजण निश्चितपणे योगाभ्यास करू शकतो. परंतु तो तज्ञांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे. तुम्ही पहिल्यांदाच योगा करत असाल तर योग्य माहिती घेऊन योगा करा. त्यामुळे तु्म्हाला कुठलाही त्रास होणार नाही.
3) योगा केवळ वृद्धांसाठी आहे
वृद्धत्व येऊ लागल्यावरच केवळ योगासने करावी असाही एक समज आहे. पण प्रत्यक्षात त्याच्या अगदी उलट आहे. योगासने लवकरात लवकर सुरू केली पाहिजे कारण त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते. नियमितपणे योगाभ्यास केल्यामुळे आपण ऊर्जावान राहतो.
4) योगा हा फक्त एक व्यायाम आहे
योगा हा केवळ व्यायामाचाच एक प्रकार आहे असे अनेकांना वाटते. परंतु योगा हे एक शास्त्र आहे. जे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. योगाचा फायदा केवळ शारीरिलाच होतो असे नाही. वजन कमी करणे असो किंवा रक्ताभिसरण नियंत्रित करणे असो. योगा अत्यंत उपयुक्त आहे आणि मज्जासंस्थेला चालना देतो.
5) योगा फक्त पुरुषांसाठी आहे
योगा केवळ पुरुषांसाठीच आहे असा समज देखील काही लोकांमध्ये आहे. परंतु योगासने पुरुष, महिला आणि अगदी 5 वर्षांची मुले देखील करू शकतात. योगाच्या बाबतीत कोणतेही बंधन किंवा भेदभाव नाही कारण तो आपल्या एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.