500 रुपयांमध्ये 2 मुलींना विकले, जव्हारमधील धक्कादायक घटना

WhatsApp Group

जव्हार : कुटुंबाचे असलेली आर्थिक परिस्थिती आणि अगतिकता याचा फायदा घेऊन जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन लहान मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा नरेश भोये आणि काळू नरेश भोये अशी या अल्पवयीन मुलींची नाव आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपाळाकडे मनीषा 3 वर्षांपासून तर काळू एक वर्षापासून बालमजुरी करत होती. मागील काही वर्षांपासून या दोन्ही चिमुकल्या या मेंढपाळाकडे मेंढ्यांची साफसफाई, घरगुती काम, मेंढ्यांसोबत गुराखी जाण अशी काम करायच्या.

या बदल्यात त्यांना वर्षाकाठी 12 हजार रुपये आणि एक मेंढी देण्याचं आश्वासन मेंढपाळाकडून देण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात वर्षाला अवघे पाचशे रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या प्रकरणाची श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेतला. त्यानंतर ही सर्व प्रकरण समोर आलं.