उत्तर प्रदेशातील एटा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे डीजेवर नाचत असताना अवघ्या 15 वर्षांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मुलगा इतर तरुणांसोबत डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तरुण हा वराचा धाकटा भाऊ होता
तोही इतर तरुणांसोबत लग्नसोहळ्याच्या वातावरणात मग्न झाला होता. काही क्षणातच तो अचानक डान्स फ्लोअरवर पडतो. तो बेशुद्धच होतो. हा तरुण वराचा लहान भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याचे नाव होते सुधीर आहे.
दूल्हे का छोटा भाई सुधीर DJ पर नाच रहा था। अचानक गिरा और मौत हो गई। उम्र सिर्फ 15 साल थी।
📍एटा, उत्तर प्रदेश pic.twitter.com/rCpL4k7yi8
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) March 7, 2024
तरुण वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षी पतियाळातील नाभा विभागात एका 15 वर्षीय तरुणाचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. ग्रेटर नोएडा येथील एका शाळेत 15 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमीही आली. जीवनशैलीतील बदलांमुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हृदयविकाराच्या इतर घटना
नुकतेच उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका मीडिया व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. 29 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग येथे एका पर्यटकाला हृदयविकाराचा झटका आल्याची वेदनादायक बातमी समोर आली. सोनमर्ग हिल स्टेशनवर स्नो बाइक राइडचा आनंद घेत असताना या पर्यटकाला हृदयविकाराचा झटका आल्याचे अहवालात म्हटले आहे.